Skip to content

Vineyard बद्दल बायबलमधील वचने

56 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्‍या शेतकर्‍यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.”

  2. मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला.

  3. नंतर त्यांनी हा दाखला सांगितला: “एका मनुष्याच्या बागेमध्ये अंजिराचे झाड वाढत होते, आणि तो फळ पाहावयास गेला पण त्याला काही सापडले नाही.

  4. जो मळ्याची काळजी घेत होता त्यास म्हणाला, ‘तीन वर्षापासून मी या अंजिराच्या झाडावर फळ शोधायला येत आहे आणि मला काहीच मिळाले नाही. ते उपटून टाक! या जागेचा व्यर्थ उपयोग का बरे?’

  5. “त्यावर माळी धन्याला म्हणाला, ‘आणखी एक वर्ष राहू द्या, मी त्याच्याभोवती खोदून खतपाणी घालेन.

  6. पुढील वर्षी फळ आले तर ठीक! नाही मिळाले तर उपटून टाका.’ ”