Skip to content

Tribute बद्दल बायबलमधील वचने

72 वचने · 24 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.

  2. प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.

  3. जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे.

  4. जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.

  5. इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

  6. तुमच्या राजाने अनेक स्त्रिया करू नयेत, जेणेकरून त्याचे अंतःकरण बहकून जाईल. त्याने आपल्यासाठी चांदी व सोन्याचा मोठा संग्रह करू नये.

  7. त्यांनी गेजेरात राहणार्‍या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात.

  8. जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले.

  9. आशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोबातील रहिवाशांस हाकलून दिले नाही.

  10. आशेरी लोक त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते, कारण त्यांनी त्यांना हाकलून दिले नाही.

  11. नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्‍यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले.

  12. आणि अमोरी लोकांनी हेरेस, अय्यालोन आणि शालब्बीम पर्वतावर देखील थांबण्याचा निर्धार केला होता, परंतु जेव्हा योसेफाच्या गोत्रांचे लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांच्यावर देखील जबरदस्तीने मजुरकामासाठी दबाव टाकण्यात आला.

  13. शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते.

  14. शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.

  15. त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील.

  16. तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्‍या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल.

  17. तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल.

  18. तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल.

  19. तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल.

  20. तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल.

  21. अदोनिराम वेठबिगारी करणार्‍यांचा अधिकारी होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता;

  22. अहीशार, राजवाड्या संबंधीच्या कामकाजाचा व्यवस्थापक होता. अब्दाचा पुत्र अदोनिराम हा मजुरांवर अधिकारी होता.

  23. शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.

  24. शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले,

  25. शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्‍यांवर अधिकारी होता.