Tower बद्दल बायबलमधील वचने: In the walls of Jerusalem
In the walls of Jerusalem बद्दल वचने
उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली.
नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.
स्तुतिगान करणारे दुसरे गायकवृंद विरुद्ध दिशेने पुढे निघाले. मी वरच्या बाजूने त्यांच्यात सामील होण्यास दुसऱ्या अर्ध्या लोकांबरोबर निघालो—आम्ही भट्टीबुरुजापासून रुंद तटापर्यंत चालत गेलो.
नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.