मुख्य मजकुरावर जा

Token बद्दल बायबलमधील वचने: Miracles of Moses, of the divine authority of his missions

9 वचने · 18 पैलू

Miracles of Moses, of the divine authority of his missions बद्दल वचने

  1. मोशेने उत्तर दिले, “जर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही किंवा माझे ऐकले नाही आणि म्हणाले, ‘याहवेह तुला प्रकट झालेच नाही’ तर मी काय करावे?”

  2. याहवेहने त्याला विचारले, “तुझ्या हातात काय आहे?” त्याने उत्तर दिले, “एक काठी!”

  3. याहवेह त्याला म्हणाले, “ती जमिनीवर टाक.” मोशेने ती जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला आणि मोशे भिऊन त्यापासून दूर पळाला.

  4. मग याहवेहने त्याला सांगितले, “हात लांब करून सापाचे शेपूट धर.” तेव्हा मोशेने त्या सापाला धरले आणि तो पुन्हा त्याच्या हातातील काठी झाला.

  5. याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.”

  6. मग याहवेह त्याला म्हणाले, “तुझा हात तुझ्या झग्याच्या आत घाल.” मग मोशेने आपला हात आपल्या झग्याच्या आत घातला आणि जेव्हा त्याने हात बाहेर काढला, त्याची कातडी कोडाने भरली; तो हिमासारखा पांढरा झाला होता.

  7. “आता परत आपला हात झग्याच्या आत घाल,” याहवेह म्हणाले आणि मोशेने परत आपला हात झग्याच्या आत घातला, आणि जेव्हा तो बाहेर काढला, तो पूर्ववत त्याच्या शरीराच्या बाकीच्या कातडीप्रमाणे झाला.

  8. तेव्हा याहवेह म्हणाले, “पहिले चिन्ह पाहून जर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर दुसरे चिन्ह पाहून कदाचित ते विश्वास ठेवतील.

  9. पण या दोन्ही चिन्हांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर तू नाईल नदीचे पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत म्हणजे नदीतून घेतलेल्या पाण्याचे जमिनीवर रक्त होईल.”