Skip to content

Token बद्दल बायबलमधील वचने: Memorial stones

8 वचने · 18 पैलू

Memorial stones बद्दल वचने

  1. “लोकातील प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषांची निवड कर,

  2. आणि त्यांना सांग की त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून, म्हणजे जिथे याजक उभे आहेत, तिथून बारा धोंडे उचलून घ्यावे आणि ते तुमच्याबरोबर घेऊन आज रात्री ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात त्या ठिकाणी ठेवावे.”

  3. तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले,

  4. आणि यहोशुआ त्यांना म्हणाला, “यार्देनेच्या मध्यभागी जिथे याहवेह तुमच्या परमेश्वराचा कोश आहे त्याच्यापुढे जा. तिथून तुमच्यातील प्रत्येकाने एक धोंडा खांद्यावर वाहून आणावा. इस्राएलच्या बारा गोत्रातील प्रत्येक गोत्रामागे एक, असे एकूण बारा धोंडे तुम्ही बारा जणांनी आणावे.

  5. ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’

  6. तेव्हा तुम्हाला त्यांना सांगता येईल, याहवेहच्या कराराच्या कोशासमोर यार्देन नदीचा वाहता प्रवाह थांबला होता. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली, तेव्हा यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह दुभागला होता. हे धोंडे इस्राएली लोकांसाठी कायमचे स्मारक चिन्ह असावे.”

  7. तेव्हा इस्राएली लोकांनी यहोशुआने सांगितल्याप्रमाणे केले. याहवेहने यहोशुआला आज्ञापिल्यानुसार प्रत्येक गोत्रामागे एक याप्रमाणे बारा धोंडे त्यांनी यार्देन नदीच्या मध्यभागातून उचलले व ज्या ठिकाणी त्यांनी छावणी दिली, त्या ठिकाणी ते धोंडे ठेवले.

  8. यहोशुआने यार्देन नदीच्या मध्यभागी असलेले बारा धोंडे जिथे कराराचा कोश वाहून नेणारे याजक उभे होते तिथे उभे केले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत.