Token बद्दल बायबलमधील वचने: A fringe
A fringe बद्दल वचने
“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: येणार्या सर्व पिढ्यांपर्यंत तुम्ही आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे, प्रत्येक गोंड्यावर निळा दोरा असावा.
ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये.
मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल.