Skip to content

The Wolf बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, आणि संध्याकाळी लूट वाटतो.”

  2. लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.

  3. लांडगा व कोकरू एकत्र चरतील. सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल. माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,” असे याहवेह म्हणतात.

  4. म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.

  5. तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.

  6. त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्‍या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;

  7. तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्‍या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.

  8. “खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात.

  9. “मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा.

  10. जा, कोकरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे.

  11. परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.

  12. मला हे माहीत आहे की मी गेल्यानंतर, क्रूर लांडगे येतील व तुम्हामध्ये शिरतील आणि ते कळपालाही सोडणार नाहीत.