मुख्य मजकुरावर जा

The Second Coming of Christ बद्दल बायबलमधील वचने: Shall reign with him at

5 वचने · 65 पैलू

Shall reign with him at बद्दल वचने

  1. मग परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांना आकाशाखाली असलेल्या राज्यांचे सार्वभौमत्व, सामर्थ्य आणि महानता देण्यात येईल. त्यांचे राज्य सनातन राज्य आहे आणि सर्व शासक त्यांची सेवा करतील व त्यांच्या आज्ञा पाळतील.’

  2. जर आपण धीराने दुःख सहन करतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू, जर आपण त्यांना नाकारतो तर तेही आपल्याला नाकारतील.

  3. तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”

  4. पहिल्या पुनरुत्थानात जे वाटेकरी होतात, ते धन्य आणि पवित्र आहेत, कारण दुसर्‍या मरणाची त्यांच्यावर सत्ता राहणार नाही. ते परमेश्वराचे व ख्रिस्ताचे याजक होऊन ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.

  5. तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील.