Skip to content

Sun बद्दल बायबलमधील वचने

32 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील.

  2. मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते.

  3. परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.

  4. त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.

  5. मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.

  6. नंतर मी एका देवदूताला सूर्यामध्ये उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणार्‍या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, परमेश्वराच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा!

  7. नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे.