मुख्य मजकुरावर जा

Sun बद्दल बायबलमधील वचने: Figurative

10 वचने · 8 पैलू

"Sun" साठी शोधा

Figurative बद्दल वचने

  1. “याहवेह याप्रकारे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होवो! जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने उगवतो तसे, जे लोक तुमच्यावर प्रीती करतात ते सर्व त्या सूर्याप्रमाणे होवोत.” त्यानंतर देशात चाळीस वर्षे देशात शांतता होती.

  2. कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.

  3. जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.

  4. यापुढे दिवसा सूर्यप्रकाश व चंद्राचे तेज तुझ्यावर पडणार नाही, कारण तुझे याहवेहच तुझा अक्षय प्रकाश होतील व तुझे परमेश्वर तुझा गौरव होतील.

  5. तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही, आणि तुझ्या चंद्राचा कधी ऱ्हास होणार नाही. कारण याहवेहच तुझा सर्वकाळचा प्रकाश असतील; आणि तुझे शोकाचे दिवस संपतील.

  6. सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.

  7. परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.

  8. त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.

  9. मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.

  10. नंतर मी एका देवदूताला सूर्यामध्ये उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणार्‍या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, परमेश्वराच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा!