मुख्य मजकुरावर जा

Spiritual Peace बद्दल बायबलमधील वचने

65 वचने · 53 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’

  2. जो कोणी अशी महत्त्वाची आणि गंभीर स्वरुपाची शपथ आपल्या कानांनी ऐकतो आणि स्वतःला आशीर्वाद देऊन म्हणतो, “माझ्या स्वतःच्याच इच्छेने मी चाललो तरी माझे काही बिघडणार नाही, मी सुरक्षित राहीन;” असे म्हणणारी माणसे सिंचित भूमी आणि कोरड्या भूमीवर नाश ओढवून घेतील.

  3. “परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल.

  4. परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल? जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल? तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,

  5. मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता.

  6. याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.

  7. परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल आणि ते विपुल शांती व समृद्धीचा उपभोग घेतील.

  8. सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे.

  9. मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.

  10. त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत समृद्धी वाढो.

  11. परमेश्वर याहवेह जे बोलतील, ते सर्व मी ऐकणार; कारण त्यांनी आपल्या लोकांना व आपल्या भक्तांना शांतीचे अभिवचन दिले आहे. परंतु आपल्या लोकांनी मूर्खपणा करण्याचे थांबवावे.

  12. जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते, आणि ते कधीही विचलित होत नाहीत.

  13. तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व पाऊलवाटांवर शांती आहे.

  14. कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे, आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे, आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल. आणि त्यांना अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर, सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील.

  15. ज्यांचे मन स्थिर आहे, त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल, कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.

  16. याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता; जे सर्वकाही आम्ही साध्य केले, ते तुम्ही आमच्यासाठी केले आहे.

  17. नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.”

  18. शांती नीतिमत्तेचे फळ असेल; नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.

  19. “दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात.

  20. पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  21. परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.

  22. कारण पर्वत हलतील व टेकड्या काढून टाकल्या जातील, परंतु तुझ्यावरील माझी अढळ प्रीती कधीही हलणार नाही वा माझा शांतीचा करार कधीही भंग होणार नाही,” असे याहवेह, तुझ्यावर करुणा करणारे म्हणतात.

  23. तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील, व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.

  24. तुम्ही आनंदाने प्रस्थान कराल व शांतीने मार्गदर्शित व्हाल; पर्वते आणि टेकड्या, तुमच्यापुढे उचंबळून गीते गातील, आणि रानातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.

  25. जे नीतिमार्गाने चालतात ते शांती पावतात; त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.