Snow बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.
जो ओढा वितळणार्या बर्फाने अदृश्य होतो; आणि द्रवीकरण होत असलेल्या हिमामुळे तो फुगून जातो,
जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,
हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’ आणि पावसाच्या सरींना, ‘मुसळधार वृष्टी होवो’ असे सांगतात.
एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन; मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन.
“या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.
लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ कधी वितळतो का? दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी कधी वाहण्याचे थांबते काय?
त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.