Skip to content

Roads बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही किंवा कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. तुझी सीमा ओलांडून जाईपर्यंत आम्ही राजमार्गावरच प्रवास करू.”

  2. “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”

  3. “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही मुख्य रस्त्यावरच राहू; उजवीकडे वा डावीकडे वळणारही नाही.

  4. यातील अंतर निश्चित करा आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या भूमीचे तीन भाग करा, म्हणजे एखाद्याने कोणाची हत्या केली, तर त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी त्या नगरात पळून जाता येईल.

  5. मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्‍या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले.

  6. बिन्यामीन लोक त्यांच्यावर हल्ला करण्यास बाहेर आले आणि माघार घेत असलेल्या इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून दूर नेले. पूर्वी केले त्याप्रमाणे बिन्यामीन पुरुषांनी इस्राएली पुरुषांना बेथेल आणि गिबियाह यांच्यामधील मार्गावर ठार करण्यास सुरुवात केली. तेव्हा इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे ठार झाली.

  7. आणि मग ते म्हणाले, पाहा, शिलोह येथे याहवेहचा उत्सव दरवर्षी असतो, तो बेथेलाच्या उत्तरेस आहे, जो रस्ता बेथेलापासून वर शेखेमास जातो त्याच्या पूर्वेकडे आणि लबोनाहच्या दक्षिणेस आहे.”

  8. तेव्हा यहूदीया प्रांत सोडून ते पुन्हा गालील प्रांतामध्ये गेले.

  9. त्यासाठी त्यांना शोमरोन प्रांतामधून जावे लागले.

  10. मग ते शोमरोनातील सूखार नावाच्या नगरास आले; ते याकोबाने आपला पुत्र योसेफास दिलेल्या शेताजवळ होते.

  11. दोन दिवसानंतर ते गालील प्रांतात गेले.