- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Retaliation बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव,
डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,
चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम किंवा इजेबद्दल इजा द्यावी.
“ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे.
“ ‘जो कोणी एखाद्या मनुष्याचा जीव घेईल त्याला निश्चित जिवे मारावे.
जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन.
जो कोणी आपल्या शेजार्याला दुखापत करतो, त्याला त्याच प्रकारे दुखापत केली पाहिजे:
हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे.
जो कोणी प्राण्याची हत्या करतो, त्याने निश्चित त्याची परतफेड करावी, परंतु जो कोणी मनुष्याची हत्या करतो त्याला जिवे मारावे.
परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
तर त्याच्या बांधवाचे जे करण्याचे त्याने मनात योजिले होते, तेच त्याचे करण्यात यावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्टाई तुम्ही घालवून टाकावी.
इतर लोक हे ऐकतील व भयभीत होतील आणि तुम्हामध्ये अशी दुष्टाई पुन्हा कधीही घडणार नाही.
खोट्या साक्षीदाराला तुम्ही दया दाखवू नये: जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय.
दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात.
“वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.
असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.”
जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.
हे विनाशका, तुझा धिक्कार असो, तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, तेव्हा तुमचा नाश होईल; जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल.
“ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’ असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे,
पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.
जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका.
जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.
तुम्हाजवळ कोणी काही मागत असल्यास त्यांना द्या आणि ज्यांना उसने हवे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
“ ‘तुमच्या शेजार्यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.
पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.