Skip to content

Religious Revivals बद्दल बायबलमधील वचने

22 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. इस्राएलचा राजा, एलाहचा पुत्र होशेच्या तिसर्‍या वर्षी, यहूदीयाचा राजा आहाजाचा पुत्र हिज्कीयाह राज्य करू लागला.

  2. हिज्कीयाह पंचवीस वर्षाचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्‍याहची कन्या होती.

  3. त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  4. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्याने मोशेने तयार केलेला कास्याच्या सापाचे तुकडे केले, कारण तोपर्यंत इस्राएली लोक त्याच्यापुढे धूप जाळत होते. (त्याला नहुशतान असे म्हणत होते.)

  5. हिज्कीयाहचा याहवेह इस्राएलांच्या परमेश्वरावर भरवसा होता. म्हणून यहूदीयाच्या सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर झाला नाही.

  6. तो याहवेहला धरून राहिला आणि त्यांचे अनुसरण करण्यापासून मागे फिरला नाही; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे तो पालन करीत राहिला.

  7. आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही.

  8. परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल, ओसाड भूमी सुपीक होईल, आणि सुपीक भूमी अरण्यासारखी वाटू लागेल.

  9. “आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  10. पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जातील; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जातील, आणि लोकांचा लोंढा त्याकडे एकत्र येईल.

  11. अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  12. ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील, दूरदूरच्या बलाढ्य राष्ट्रांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  13. प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपआपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही, कारण सर्वसमर्थ याहवेहने म्हटले आहे.

  14. सर्व राष्ट्रे आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील, पण आम्ही नेहमी याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू.

  15. याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मी लंगड्यांना एकत्र करेन; बहिष्कृत लोकांना आणि ज्यांना मी दुखविले आहे त्यांनाही एकत्र करेन.

  16. मी लंगड्यांना माझे अवशेष करेन, आणि बहिष्कृत लोकांना एक बलाढ्य राष्ट्र करेन. त्या दिवसापासून याहवेह सीयोन पर्वतावरून सदासर्वदा राज्य करतील.

  17. आणि तू, कळपाच्या टेहळणीच्या बुरुजा, सीयोन कन्येच्या मजबूत किल्ल्या, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत देण्यात येईल; यरुशलेमच्या कन्येला सिंहासन दिले जाईल.”

  18. हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे; मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे. आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा, आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या; क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या.

  19. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जगभरचे लोक व अनेक नगरांमधील रहिवासी येतील,

  20. आणि एका नगरामधील रहिवासी दुसऱ्या नगरात जातील व त्यांना म्हणतील, ‘चला आपण याहवेहला विनंती करू व सर्वसमर्थ याहवेहचा शोध घेऊ. मी स्वतःच जात आहे.’

  21. आणि पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे देखील यरुशलेमला येतील व सर्वसमर्थ याहवेहकडे विनंती करतील.”

  22. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्या दिवसात सर्व राष्ट्रांतील व सर्व भाषिक अशी दहा माणसे एका यहूदीच्या अंगरख्याच्या टोकास पकडून म्हणतील, ‘आम्हाला तुमच्याबरोबर येऊ द्या, कारण परमेश्वर तुम्हासोबत आहेत असे आम्ही ऐकले आहे.’ ”