Skip to content

Purity बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.

  2. याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात.

  3. याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?

  4. ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.

  5. त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.

  6. एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन; मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन.

  7. आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली, तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली.

  8. तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत.

  9. दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात.

  10. “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल?

  11. दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते.

  12. जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते;

  13. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.

  14. मी माझा हात तुमच्याविरुद्ध उचलेन; मी तुमची सर्व मलिनता पूर्णपणे काढून टाकेन आणि तुमची सर्व अशुद्धता काढून दोषरहित करेन.

  15. माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, “हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे.”

  16. पुष्कळ लोक शुद्ध, निष्कलंक आणि निर्मळ केले जातील, परंतु दुष्ट आपल्या दुष्टपणातच मग्न राहतील; एकाही दुष्टाला या गोष्टी समजणार नाही, परंतु जे सुज्ञ आहेत त्यांनाच याचा अर्थ काय ते समजेल.

  17. चुकीच्या वजनाच्या पिशवीने, कपटाच्या वजनांनी मी कोणाची सुटका करू काय?

  18. पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल.

  19. रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील,

  20. धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.

  21. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.

  22. शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा.

  23. आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी.

  24. ते विश्वासाचे गुप्त सत्य शुद्ध विवेकबुद्धीने राखणारे असावेत.

  25. अध्यक्ष निवडण्यात कधीही घाई करू नको. इतरांच्या पापात सहभागी होऊ नको आणि तू स्वतःस शुद्ध राख.