Proselytes बद्दल बायबलमधील वचने: Were entitled to all privileges
Were entitled to all privileges बद्दल वचने
“तुमच्याबरोबर राहणार्या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये.
जो विदेशी मनुष्य याहवेहशी एकनिष्ठ राहतो, त्याने असे म्हणू नये, “याहवेह निश्चितच मला त्यांच्या लोकांमघून वगळतील.” आणि कोणत्याही षंढाने अशी तक्रार करू नये, “मी तर केवळ एक शुष्क वृक्ष आहे.”
तर याहवेह असे म्हणतात: “जे षंढ माझे शब्बाथ पवित्रपणे पाळतात, जे मला आवडणार्या गोष्टीच निवडतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—
त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.
आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, जे त्यांची सेवा करतात, त्यांच्या नावावर प्रीती करतात, आणि त्यांचे सेवक झाले आहेत, जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—
अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”