Proselytes बद्दल बायबलमधील वचने: To give up all heathen associates
To give up all heathen associates बद्दल वचने
परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील.
बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही.
अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे; तू आपली माणसे आणि आपल्या पित्याचे घर विसर.
“जो कोणी माझ्याकडे येतो आणि जर आपले आईवडील, पत्नी आणि मुले, भाऊ व बहिणी किंबहुना स्वतःच्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.