Skip to content

Prison बद्दल बायबलमधील वचने

16 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले, परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता,

  2. तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!”

  3. आणि त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात ठेवले.

  4. तिसर्‍या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला, “जर जीवित राहवयाचे असेल तर तुम्ही हे करा, कारण मी परमेश्वराचे भय धरणारा आहे.

  5. तुम्ही प्रामाणिक लोक आहात तर तुमच्या एका भावाला तुरुंगात राहू द्या, बाकीच्यांना कुटुंबीयांची उपासमार निवारण्यासाठी धान्य घेऊन जाऊ द्या.

  6. तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

  7. आणि त्यांनी त्याला ताब्यात ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी त्यांना काही स्पष्ट माहीत नव्हते.

  8. तुमच्या परमेश्वराची आज्ञा न मानणार्‍यांना आणि राजांचे नियम मोडणार्‍यांना ताबडतोब मृत्यू, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती, किंवा तुरुंगवास यापैकी कोणतीही शिक्षा द्यावी.

  9. यिर्मयाह अद्यापही तुरुंगात असताना याहवेहचे त्याला दुसऱ्यांदा वचन आले:

  10. मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले.

  11. बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते.

  12. त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशीही कैदेतच ठेवले.

  13. त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात डांबले.

  14. पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर चार शिपायांच्या चार दलांचा पहारा बसविला. वल्हांडण सण झाल्यावर त्याला बाहेर आणून समुदायापुढे चौकशी करावी असा हेरोदाचा हेतू होता.

  15. पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती.

  16. असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.