- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Poor बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to
Unclassified scriptures relating to बद्दल वचने
आणि गरिबाच्या न्यायवादात तो दोषी असता, त्यावर दया दाखवू नये.
“तुमच्यातील गरिबांच्या न्यायवादात त्यांचा न्याय नाकारला जाऊ नये.
“ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्याचा योग्य न्याय करावा.
गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.
नहेम्याह म्हणाला, “जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे.”
म्हणून लोक मिष्टान्ने करून खाण्या-पिण्यासाठी आणि ताटे वाढून पाठविण्यासाठी गेले. तो दिवस मोठ्या आनंदाने उत्सव करण्याचा होता, कारण त्यांना देण्यात आलेले वचन आता त्यांना समजले होते.
ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत, आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली.
कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, त्यांची मी सुटका केली.
मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.
मी अंधाचे नेत्र आणि पांगळ्यांचे पाय असा होतो.
मी गरजवंतांचा पिता होतो; आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे.
संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय? गरिबांसाठी माझा जीव खिन्न झाला नाही काय?
कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय? एकाच परमेश्वराने आम्हा दोघांना आमच्या मातांच्या उदरात निर्माण केले नाही काय?
“जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्या असतील अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल,
जर मी माझे अन्न स्वतःपाशीच ठेवले, आणि ते मी अनाथांना वाटून दिले नाही—
परंतु माझ्या तारुण्याच्या दिवसांपासून पित्याने करावे तसे मी त्यांचे पोषण केले, आणि माझ्या जन्मापासून मी विधवांचे मार्गदर्शन केले.
मी जर कोणाला वस्त्राविना, आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले,
त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले तरीही त्यांच्या हृदयाने मला आशीर्वाद दिला नाही,
न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून, मी जर एखाद्या अनाथावर हात उगारला असेन,
तर खांद्यापासून माझा हात गळून पडो, सांध्यापासून ते तुटून जावोत.
जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही आणि गरिबांपेक्षा श्रीमंतावर उपकार करत नाही, कारण ते सर्व त्यांचीच हस्तकृती नाहीत काय?
दुर्जनांनी दुष्टाईने मिळविलेल्या विपुल धनापेक्षा नीतिमानाचे सीमित धन बरे;
दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.
दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.
कारण त्याने इतरांना दया दाखविली नाही, उलट गरजवंतांचा त्याने छळ केला आणि दुःखीकष्टी लोकांचा त्यांना मृत्यू येईपर्यंत पाठलाग केला.