Poor बद्दल बायबलमधील वचने: Inexpensive offerings of the impecunious
Inexpensive offerings of the impecunious बद्दल वचने
परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी.
जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.
जर तो गरीब असेल आणि इतके आणण्याची त्याची ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे. अन्नार्पणासाठी जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग आणावा,
आणि ऐपतीप्रमाणे त्याने पारव्याची दोन पिल्ले किंवा दोन होले आणावे; त्यातील एक पापबली व दुसरा होमबली म्हणून अर्पण करावा.