Pools and Ponds बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा रक्त असेल.”
जेरुइयाहचा पुत्र योआब आणि दावीदाची माणसे बाहेर पडली आणि गिबोनाच्या तळ्याकडे भेटली. एक गट तळ्याच्या एका बाजूला खाली बसला आणि दुसरा गट तळ्याच्या दुसर्या बाजूला बसला.
तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.
शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत), आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.
अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.
हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना, त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल आणि त्याने तळी व पाट खणून शहरात पाणी कसे आणले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केल्या नाहीत काय?
पुढे आम्ही झर्याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती.
ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.
त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले.
तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे.
“मी तिला घुबडांचे निवासस्थान आणि दलदलीचा प्रदेश करेन; मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकेन,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.
कापडकामाचे कारागीर उदास होतील, आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील.
तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती; खालच्या जलाशयात तुम्ही पाणी साठविले होते.
जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला, परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही, किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही.
तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. जिथे कधी कोल्हे निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.
ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.
निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे जिचे पाणी गळून चालले आहे. “थांबा, थांबा,” ते ओरडतात, पण कोणीही वळून तिच्याकडे परत येत नाही.
आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरामी भाषेत बेथेस्दा म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या.
“जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू.” (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला.