Pontius Pilate बद्दल बायबलमधील वचने: Allows Joseph of Arimathaea to take Jesus' body
Allows Joseph of Arimathaea to take Jesus' body बद्दल वचने
संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य,
पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली.
सभेचा एक सन्मान्य सभासद अरिमथियाकर योसेफ, स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले.
येशू इतक्या लवकर मरण पावले हे ऐकून पिलाताला नवल वाटले. त्याने शताधिपतीला बोलाविले आणि विचारले, येशूंचा मृत्यू आधी झाला आहे की काय?
ते खरे असल्याचे शताधिपतीकडून समजल्यावर, त्याने येशूंचे शरीर योसेफाच्या ताब्यात दिले.
पिलाताकडे जाऊन त्याने येशूंचे शरीर मिळण्यासाठी विनंती केली.
त्यानंतर अरिमथियाकर योसेफाने येशूंचे शरीर पिलाताकडे मागितले. आता योसेफ येशूंचा एक गुप्त अनुयायी असून यहूदी पुढार्यांना भीत होता. पिलाताच्या परवानगीने, तो आला आणि येशूंचे शरीर घेऊन गेला.