- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Perseverance बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे.
कारण परमेश्वर अन्यायी नाहीत. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत.
आमची इच्छा आहे की तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत असाच उत्साह दाखवावा, म्हणजे जी आशा तुम्ही बाळगता ती पूर्ण होईल.
तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत.
मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले.
कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला.
परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे व आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो, त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे.
आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत.
तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.
तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे.
यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे.
आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.
ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही.
पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही.
आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले, “माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस, त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस,
कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात, आणि ज्या प्रत्येकाला पुत्र म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात.”
तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे?
जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत.
आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे!
त्यांनी थोडे दिवस त्यांना योग्य वाटली तशी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे.
कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.
यास्तव, आपले गळणारे हात व निर्बल गुडघे सशक्त करा.
“आणि तुमच्या पावलांसाठी मार्ग सरळ करा,” म्हणजे लंगडे पडून अपंग होणार नाही, उलट बरे होतील.
परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.
म्हणून कोणत्याही प्रकारच्या अनोळखी शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. जे खाऊन खाणार्याचा जीवनाला काहीच फायदा होत नाही असे विधिविषयक विशिष्ट पदार्थ खाण्याने नव्हे, तर तुमचे अंतःकरण कृपेने बळकट करणे चांगले आहे.