Skip to content

Missions बद्दल बायबलमधील वचने

60 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले.

  2. यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”

  3. आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, तेव्हा अरामी भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली. ‘शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? पराणीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.’

  4. “मी विचारले, ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ “प्रभूने त्याला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे,

  5. आता उठून आपल्या पायांवर उभा राहा. मी तुला यासाठी दर्शन दिले आहे की जे तू माझ्याविषयी पाहिले व जे प्रकट होणार आहे त्याविषयी तुला सेवक व साक्षी नेमावे.

  6. मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे

  7. यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’

  8. कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तिथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत.

  9. नंतर मी अंतराळाच्या मध्यभागी दुसरा एक देवदूत उडतांना पाहिला. पृथ्वीवर राहणार्‍या सर्वांना, म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोकांना सांगण्यासाठी तो सर्वकालची शुभवार्ता घेऊन चालला होता.

  10. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.”