Milcah बद्दल बायबलमधील वचने: 1. Wife of Nahor and mother of Bethuel
1. Wife of Nahor and mother of Bethuel बद्दल वचने
अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.
काही वेळेनंतर अब्राहामाला सांगण्यात आले, “त्याचा भाऊ नाहोर याची पत्नी मिल्का हिलाही मुले झाली आहेत:
ऊस हा त्याचा प्रथमपुत्र, त्याचा भाऊ बूज व कमुवेल (अरामचा पिता)
आणि केसद, हजो, पिलदाश, यिदलाप व बेथुएल.”
बेथुएल रिबेकाहचा पिता झाला.
त्याची प्रार्थना समाप्त होण्यापूर्वी रिबेकाह खांद्यावर घागर घेऊन तिथे आली. ती नाहोर आणि मिल्का यांचा पुत्र बेथुएल याची कन्या होती. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ होता.
तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.”
“मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ “ती म्हणाली, ‘मी नाहोराचे पुत्र बेथुएलाची, ज्यांची माता मिल्का आहे, त्यांची कन्या आहे.’ “हे ऐकून मी तिच्या नाकात नथ आणि हातात पाटल्या घातल्या.