Skip to content

Midianites बद्दल बायबलमधील वचने

83 वचने · 28 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वर तेमान वरून आले, परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे.

  2. त्यांचे तेज सूर्योदयेसारखे होते; किरणे त्यांच्या हातांतून चकाकत बाहेर निघत होती, जिथे त्यांचे सामर्थ्य लपलेले होते.

  3. महामारी त्यांच्या पुढे चालते; घातकी रोग त्यांच्यामागे चालतात.

  4. ते थांबले व त्यांनी पृथ्वीस हालवून टाकले; त्यांनी बघितले व देशास थरकाप आणला. पुरातन पर्वतांचा चुराडा झाला प्राचीन डोंगर ढासळले— परंतु ते सर्वकाळ मार्गस्थ आहेत.

  5. कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले.

  6. आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे.

  7. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.

  8. अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.