Midianites बद्दल बायबलमधील वचने: Allowed to oppress Israel
Allowed to oppress Israel बद्दल वचने
इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले.
कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.
जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत.
त्यांनी तेथील जमिनीवर तळ ठोकला आणि गाझापर्यंत पिकांची नासाडी केली आणि इस्राएलसाठी मेंढ्या, गुरे, गाढवेही त्यांनी जिवंत ठेवली नाहीत.
ते टोळांच्या समुहासारखे त्याचे तंबू आणि त्यांचे पशुधन घेऊन आले. त्यांना किंवा त्यांचे उंट मोजणे शक्य नव्हते; त्यांनी ती भूमी उद्ध्वस्त करण्यासाठी आक्रमण केले.
अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले.