Skip to content

Memorial बद्दल बायबलमधील वचने

14 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत.

  2. गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव.

  3. “भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले.

  4. जेव्हा फारोह हट्टाने आम्हाला जाऊ देत नव्हता, तेव्हा याहवेहने संपूर्ण इजिप्त देशातील लोकांचे व जनावरांचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. म्हणून प्रत्येक उदरातून प्रथम जन्मलेला नर आम्ही याहवेहला समर्पित करतो आणि ते आम्ही खंडणी भरून सोडवितो.’

  5. आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.”

  6. मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्‍या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ”

  7. मोशेने अहरोनाला सांगितले, “एक पात्र घे व त्यात एक ओमेर मान्ना घाल. मग तो पुढे येणार्‍या पिढ्यांसाठी याहवेहसमोर ठेव.”

  8. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे, अहरोनाने तो मान्ना कराराच्या पाट्यांबरोबर ठेवला, अशासाठी की तो राखून ठेवला जाईल.

  9. आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी.

  10. यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

  11. नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”

  12. आणि आभार मानून ती मोडली आणि ते म्हणाले, “हे माझे शरीर तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”

  13. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर, प्याला घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे; ज्या ज्यावेळी तुम्ही हा प्याल, त्यावेळी हे माझ्या स्मरणार्थ करा.”

  14. कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता.