मुख्य मजकुरावर जा

Mahanaim बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.

  2. त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

  3. शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले.

  4. हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता.

  5. नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले.

  6. दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी

  7. दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी,

  8. मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”