Skip to content

Love to Christ बद्दल बायबलमधील वचने

15 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, हे परमसुंदरी? तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, की तू आम्हाला शपथ देऊन ही कामगिरी सोपवावीस?

  2. माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद, दहा हजारात श्रेष्ठ आहे.

  3. त्याचे मस्तक शुद्ध सोन्यासारखे आहे; त्याचे केस कुरळे असून डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत.

  4. ओढ्याच्या काठावर असलेल्या, कबुतरांप्रमाणे त्याचे डोळे आहेत, जसे ते दुधात धुतलेले, रत्नजडित केल्यासारखे आहेत.

  5. त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे अत्तर दरवळणारे आहेत. त्याचे ओठ गंधरस गाळणार्‍या कमळपुष्पासारखे आहे.

  6. त्याचे बाहू पुष्कराजाने सुशोभित केलेल्या सुवर्णस्तंभासारखे आहेत. त्याचे शरीर नीलम रत्नांनी सुशोभित करून उजळ केलेल्या हस्तिदंतासारखे आहे.

  7. त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले संगमरवरी स्तंभच आहेत. त्याचे रूप लबानोनासारखे आहे, उत्तम देवदारूसारखे आहे.

  8. त्याचे मुख परममधुर आहे; तो सर्वस्वी सुंदर आहे. यरुशलेमच्या कन्यांनो, हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे.

  9. संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य,

  10. पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली.

  11. योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले,

  12. आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला.

  13. जेवल्यानंतर येशू शिमोन पेत्राला म्हणाले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?” तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “होय, प्रभू, आपणाला माहीत आहे, की माझे तुमच्यावर प्रेम आहे.” येशूंनी त्याला म्हटले, “तर माझ्या कोकरांना चार.”

  14. येशूंनी पुन्हा विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?” पेत्र म्हणाला, “होय, प्रभू मी आपणावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” येशू त्याला म्हणाले, “माझ्या मेंढरांना पाळ.”

  15. तिसर्‍या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” “तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला “प्रभूजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो.” येशू म्हणाले, “माझ्या मेंढरांस चार.