मुख्य मजकुरावर जा

Love to Christ बद्दल बायबलमधील वचने: His personal excellence is deserving of

8 वचने · 34 पैलू

"Love to Christ" साठी शोधा

His personal excellence is deserving of बद्दल वचने

  1. तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, हे परमसुंदरी? तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, की तू आम्हाला शपथ देऊन ही कामगिरी सोपवावीस?

  2. माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद, दहा हजारात श्रेष्ठ आहे.

  3. त्याचे मस्तक शुद्ध सोन्यासारखे आहे; त्याचे केस कुरळे असून डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत.

  4. ओढ्याच्या काठावर असलेल्या, कबुतरांप्रमाणे त्याचे डोळे आहेत, जसे ते दुधात धुतलेले, रत्नजडित केल्यासारखे आहेत.

  5. त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे अत्तर दरवळणारे आहेत. त्याचे ओठ गंधरस गाळणार्‍या कमळपुष्पासारखे आहे.

  6. त्याचे बाहू पुष्कराजाने सुशोभित केलेल्या सुवर्णस्तंभासारखे आहेत. त्याचे शरीर नीलम रत्नांनी सुशोभित करून उजळ केलेल्या हस्तिदंतासारखे आहे.

  7. त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले संगमरवरी स्तंभच आहेत. त्याचे रूप लबानोनासारखे आहे, उत्तम देवदारूसारखे आहे.

  8. त्याचे मुख परममधुर आहे; तो सर्वस्वी सुंदर आहे. यरुशलेमच्या कन्यांनो, हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे.