Hushai बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता.
दावीद त्याला म्हणाला, “तू जर माझ्याबरोबर आलास, तर तू मला भार मात्र होशील.
तर तू परत शहराकडे जा आणि अबशालोमास म्हण, ‘महाराज, मी आपला सेवक होईन; आधी मी तुमच्या पित्याचा सेवक होतो, परंतु आता मी तुमचा सेवक होईन,’ असे केल्यास अहीथोफेलचा सल्ला निष्फळ करून तू मला मदत करशील.
सादोक याजक व अबीयाथार हे तिथे तुझ्याबरोबर असणार नाहीत काय? तू जे काही राजाच्या राजवाड्यात ऐकशील ते जाऊन त्यांना सांग.
त्यांचे दोन पुत्र, सादोकचा पुत्र अहीमाज व अबीयाथारचा पुत्र योनाथान त्यांच्याबरोबर आहेत. जे काही तू ऐकशील ते मला सांगण्यास त्यांना माझ्याकडे पाठव.”
तेव्हा अबशालोम शहरात प्रवेश करीत असताना, दावीदाचा मित्र हूशाई यरुशलेमात पोहोचला.
तेव्हा दावीदाचा मित्र हूशाई अर्की अबशालोमकडे गेला व त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! राजा चिरायू होवो!”
अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?”
हूशाई अबशालोमला म्हणाला, “नाही, याहवेहने आणि या लोकांनी, आणि सर्व इस्राएलच्या लोकांनी ज्याला निवडले आहे; मी त्याचा आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार.
आणि मी कोणाची सेवा करावी? जशी मी आपल्या पित्याची सेवा केली तशीच मी त्यांच्या पुत्राची करू नये काय? म्हणून मी तुमची सेवा करणार.”