- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
High Places बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“ ‘धिक्कार! तुझा धिक्कार असो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुझ्या इतर दुष्टतेबरोबर,
तू स्वतःसाठी घुमट बांधले आणि प्रत्येक चौकात उच्च पूजास्थान बनविले.
प्रत्येक रस्त्याच्या कोपर्यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला.
मोठ्या लैंगिक अवयवांचे इजिप्तचे लोक तुझे शेजारी, यांच्याशी तू वेश्यावृत्ती केली आणि तुझ्या या वाढत्या व्यभिचाराने तू माझा क्रोध भडकावला.
यामुळे मी माझा हात तुझ्याविरुद्ध पसरविला आणि तुझी सीमा कमी केली; मी तुला तुझ्या वैरिणी, म्हणजेच पलिष्टी स्त्रियांच्या हावेस स्वाधीन केले, ज्यांना तुझ्या या अश्लील वर्तनामुळे धक्का बसला आहे.
तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही.
तेव्हा तू आपली व्यभिचारी प्रवृत्ती वाढवली व बाबिलोन जो व्यापाऱ्यांच्या देशाला सामील केले, परंतु त्यातही तू तृप्त झाली नाही.
“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, जेव्हा तू या सर्व गोष्टी करीत एका निर्लज्ज वेश्येप्रमाणे वागतेस, तेव्हा मी तुझ्याविरुद्ध क्रोधाने भरतो!
तू जेव्हा प्रत्येक रस्त्याच्या कोपर्यावर तुझी वेश्यागृहे आणि प्रत्येक चौकात तुझी उच्च पूजास्थाने बांधली, तू एका वेश्येप्रमाणे नव्हती, कारण तू मोबदला नाकारला.
“ ‘हे व्यभिचारी पत्नी! आपल्या पतीपेक्षा तुला अनोळखी लोक आवडतात!
प्रत्येक वेश्येस भेट मिळते, परंतु तू आपल्या सर्व प्रियकरांना भेट देतेस, त्यांनी चहूकडून तुझ्या अश्लील वासना पुरविण्यासाठी यावे म्हणून त्यांना लालूच देतेस.
म्हणून तुझ्या वेश्या व्यवसायाबाबत तू इतरांपेक्षा वेगळी आहेस; तू आवडते म्हणून कोणीही तुझ्यामागे धावत नाही. तू अगदी वेगळी आहेस, कारण तू वेतन देतेस आणि तुला काही मिळत नाही.
“ ‘म्हणून हे वेश्या, याहवेहचे वचन तू ऐक!
सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू तुझी वासना ओतली आणि स्वैरपणाने तुझ्या प्रियकरांसमोर तुझे नग्न शरीर उघडे केले आणि तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे आणि तू तुझ्या लेकरांचे रक्त सांडले,
यामुळे ज्यांच्याठायी तुला सुख मिळाले त्या तुझ्या सर्व प्रियकरांना मी एकत्र करेन, ज्यांच्यावर तू प्रेम केले, तसेच ज्यांचा तू वीट केला. मी त्यांना चहूकडून तुझ्याविरुद्ध एकत्र करेन आणि त्यांच्यासमोर तुला नग्न करेन आणि ते तुझी पूर्ण नग्नता पाहतील.
ज्या स्त्रिया व्यभिचार करतात व रक्तपात करतात त्यांची शिक्षा मी तुला देईन; मी आपल्या कोपाने व ईर्ष्येच्या क्रोधाने तुझ्यावर रक्तदोष आणेन.
तेव्हा मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती स्वाधीन करेन आणि ते तुझे घुमट पाडतील आणि तुझ्या उच्च पूजास्थानांचा नाश करतील. ते तुझी वस्त्रे उतरवतील आणि तुझे उत्तम दागिने घेऊन तुला अगदी पूर्णतः नग्न करून सोडतील.
ते तुझ्या विरोधात टोळी आणतील, जे तुला धोंडमार करून आपल्या तलवारीने तुझे तुकडे करतील.
ते तुझी घरे जाळतील व अनेक स्त्रियांदेखत तुला शिक्षा करतील. मी तुझ्या वेश्यावृत्तीचा अंत करेन आणि यापुढे तू तुझ्या प्रियकरांना आणखी वेतन देणार नाहीस.
तेव्हा तुझ्यावरचा माझा कोप शांत होईल आणि माझा ईर्ष्येचा क्रोध निघून जाईल; मी शांत होईन व आणखी रागावणार नाही.
“ ‘तू आपल्या तारुण्यातील दिवसांची आठवण केली नाहीस तर ज्या सर्व कृत्यांनी मला चिडविले, तू केलेल्या कृत्यांचे प्रतिफळ मी खचितच तुझ्या माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तू तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये अश्लीलतेची भर घातली नाही काय?