Skip to content

High Places बद्दल बायबलमधील वचने: Condemned for building

13 वचने · 43 पैलू

Condemned for building बद्दल वचने

  1. “ ‘धिक्कार! तुझा धिक्कार असो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुझ्या इतर दुष्टतेबरोबर,

  2. तू स्वतःसाठी घुमट बांधले आणि प्रत्येक चौकात उच्च पूजास्थान बनविले.

  3. प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला.

  4. मोठ्या लैंगिक अवयवांचे इजिप्तचे लोक तुझे शेजारी, यांच्याशी तू वेश्यावृत्ती केली आणि तुझ्या या वाढत्या व्यभिचाराने तू माझा क्रोध भडकावला.

  5. यामुळे मी माझा हात तुझ्याविरुद्ध पसरविला आणि तुझी सीमा कमी केली; मी तुला तुझ्या वैरिणी, म्हणजेच पलिष्टी स्त्रियांच्या हावेस स्वाधीन केले, ज्यांना तुझ्या या अश्लील वर्तनामुळे धक्का बसला आहे.

  6. तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही.

  7. तेव्हा तू आपली व्यभिचारी प्रवृत्ती वाढवली व बाबिलोन जो व्यापाऱ्यांच्या देशाला सामील केले, परंतु त्यातही तू तृप्त झाली नाही.

  8. “ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, जेव्हा तू या सर्व गोष्टी करीत एका निर्लज्ज वेश्येप्रमाणे वागतेस, तेव्हा मी तुझ्याविरुद्ध क्रोधाने भरतो!

  9. तू जेव्हा प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तुझी वेश्यागृहे आणि प्रत्येक चौकात तुझी उच्च पूजास्थाने बांधली, तू एका वेश्येप्रमाणे नव्हती, कारण तू मोबदला नाकारला.

  10. “ ‘हे व्यभिचारी पत्नी! आपल्या पतीपेक्षा तुला अनोळखी लोक आवडतात!

  11. प्रत्येक वेश्येस भेट मिळते, परंतु तू आपल्या सर्व प्रियकरांना भेट देतेस, त्यांनी चहूकडून तुझ्या अश्लील वासना पुरविण्यासाठी यावे म्हणून त्यांना लालूच देतेस.

  12. म्हणून तुझ्या वेश्या व्यवसायाबाबत तू इतरांपेक्षा वेगळी आहेस; तू आवडते म्हणून कोणीही तुझ्यामागे धावत नाही. तू अगदी वेगळी आहेस, कारण तू वेतन देतेस आणि तुला काही मिळत नाही.

  13. “ ‘म्हणून हे वेश्या, याहवेहचे वचन तू ऐक!