मुख्य मजकुरावर जा

Heshbon बद्दल बायबलमधील वचने

18 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्‍यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली.

  2. हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.

  3. म्हणूनच कवी म्हणतात: “हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या; सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या.

  4. “हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.

  5. हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.

  6. “पण आम्ही त्यांना पराजित केले आहे; दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे. मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत, आम्ही त्यांचा नाश केला आहे.”

  7. याप्रमाणे इस्राएली अमोरी लोकांच्या देशात स्थायिक झाले.

  8. मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले.

  9. नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले.

  10. याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”

  11. तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.

  12. गादच्या गोत्राकडून: गिलआद मधील रामोथ (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), महनाईम,

  13. हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.

  14. “त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे हेशबोनपासून एलिआलेह आणि याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम आणि एग्लाथ-शलीशियापर्यंत तो ऐकू येत आहे, निम्रीमाची कुरणेही आता शुष्क झाली आहेत.

  15. जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात, आणि त्यांच्या खोट्या दैवतांना धूप जाळतात त्या मोआबभूमीत या गोष्टी मी आता बंद पाडेन,” याहवेह असे जाहीर करतात.

  16. अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

  17. याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.

  18. “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.