मुख्य मजकुरावर जा

Eucharist बद्दल बायबलमधील वचने

44 वचने

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. उपकारस्तुतीचा प्याला ज्याबद्दल आपण उपकारस्तुती करतो ती ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सहभागिता नाही का? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराशी सहभागिता नाही का?

  2. कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळजण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत.

  3. तुम्ही प्रभूचा प्याला आणि भुतांचा प्याला यातून एकाच वेळी पिऊ शकणार नाही. तसेच प्रभूचा मेज आणि भुतांचा मेज या दोन्हीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सहभागी होता येत नाही.

  4. प्रभूला ईर्षेस पेटवावे असा प्रयत्न आपण करतो काय? आपण त्यांच्यापेक्षा शक्तिमान आहोत काय?

  5. तुम्ही एकत्र येता, तेव्हा ते केवळ प्रभुभोजन खाण्यासाठी नव्हे,

  6. जेव्हा तुम्ही भोजन करता, तेव्हा तुमच्यातील काहीजण इतरांचा विचार न करता स्वतःचे भोजन करतात. याचा परिणाम, एकजण उपाशी राहतो व दुसरा द्राक्षारसाने ओतप्रोत भरतो.

  7. खाणेपिणे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची घरे नाहीत काय? किंवा तुम्ही परमेश्वराच्या मंडळीचा अनादर करून ज्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांना लाजविता काय? मी तुम्हाला काय म्हणावे? मी तुमची प्रशंसा करावी काय? याबाबतीत अजिबात नाही.

  8. जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सोपवून दिले आहे: ज्या रात्री प्रभू येशूंचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री त्यांनी भाकर घेतली,

  9. आणि आभार मानून ती मोडली आणि ते म्हणाले, “हे माझे शरीर तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”

  10. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर, प्याला घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे; ज्या ज्यावेळी तुम्ही हा प्याल, त्यावेळी हे माझ्या स्मरणार्थ करा.”

  11. कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता.

  12. आणि म्हणून, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचे शरीर आणि रक्त याविरुद्ध पाप करतो.

  13. याच कारणासाठी ही भाकर खाण्यापूर्वी आणि हा प्याला पिण्यापूर्वी प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण करावे.

  14. जो ख्रिस्ताचे मंडळीरूपी शरीर न ओळखता अयोग्य प्रकारे ही भाकर खातो आणि हा प्याला पितो, तो स्वतःवर न्याय ओढवून घेतो.

  15. म्हणूनच तुमच्यामध्ये अनेकजण दुर्बल व आजारी आहेत, एवढेच नव्हे तर काहीजण मृत्यू पावले आहेत.

  16. परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता.

  17. जरी आपला न्याय प्रभूने अशा रीतीने केला, तरी तुम्हाला शिस्त लागावी, यासाठी की शेवटी जगाबरोबर आपणही दोषी ठरविले जाऊ नये.

  18. म्हणूनच, प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही भोजनासाठी एकत्र येता, तेव्हा सर्वजण एकमेकांसाठी थांबून एकत्रित भोजन करा.

  19. तुमच्यापैकी कोणी भुकेला असला तर त्याने घरीच काहीतरी खाऊन यावे, यासाठी की जेव्हा तुम्ही एकत्रित जेवता त्यावेळी दंडपात्र होऊ नये. इतर बाबींसंबंधी मी तिकडे आल्यावर पुढील मार्गदर्शन करेन.