Skip to content

Defilement बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 43 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्‍या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.

  2. “ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो.

  3. परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे.

  4. जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्‍या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”

  5. वर उल्लेखलेल्या प्राण्यांमुळे तुम्ही अशुद्ध व्हाल, जो कोणी त्यांच्या मृतशरीराना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  6. जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.

  7. ज्या प्राण्यांचे खूर अर्धवट दुभागलेले आहेत किंवा जे प्राणी रवंथ करीत नाहीत, अशा प्राण्यांच्या मृतशरीरांना तुम्ही स्पर्श केलात, तर तुम्ही अशुद्ध व्हाल.

  8. पंजांवर चालणारा प्रत्येक प्राणी खाण्यास तुम्हाला मनाई आहे. अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

  9. जो कोणी त्याचे मृतदेह उचलून नेईल त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. तो प्राणी तुम्ही अशुद्ध समजावा.

  10. जे कोणी अशा माणसाच्या अंथरुणाला स्पर्श करतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत ते अशुद्ध राहतील.

  11. स्रावामुळे अशुद्ध झालेला मनुष्य ज्या बैठकीवर बसला असेल त्या बैठकीवर जो कोणी बसेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. त्याने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे.

  12. जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  13. ज्या कोणा शुद्ध व्यक्तीवर असा मनुष्य थुंकेल, त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  14. ज्या वाहनांचा तो स्त्राव होणारा मनुष्य उपयोग करेल ते वाहन अशुद्ध होय,

  15. आणि जो कोणी अशा माणसाच्या अंगाखालील वस्तूला स्पर्श करेल किंवा ती उचलेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  16. हात धुतल्याशिवाय स्त्राव होणारा मनुष्य जर कोणाला स्पर्श करेल, तर स्पर्श झालेल्या त्या मनुष्याने अवश्य आपली वस्त्रे धुवावीत आणि पाण्याने स्नान करावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  17. याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये,

  18. आपले जवळचे नातलग म्हणजे त्याची आई किंवा वडील, पुत्र किंवा कन्या, त्याचा भाऊ

  19. किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो.

  20. याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये.

  21. “ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत.

  22. त्यांनी त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र राहावे आणि त्यांच्या परमेश्वराच्या नावाला काळिमा लावू नये. ते याहवेहला अन्नार्पण म्हणजे त्यांच्या परमेश्वराचे अन्न अर्पितात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे.

  23. “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग की, इस्राएलच्या लोकांनी आणलेल्या पवित्र अर्पणांचा आदर करावा, म्हणजे ते माझ्या पवित्र नावाला अपवित्र करणार नाही. मी याहवेह आहे.

  24. “त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे.

  25. “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,