Skip to content

Curse बद्दल बायबलमधील वचने

47 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करा आणि त्यांच्या ज्या आज्ञा आणि विधी आज मी तुम्हाला देत आहे, ते सर्व तुम्ही पाळावे.”

  2. त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञापिले:

  3. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  4. आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

  5. तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएली लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे:

  6. “जो याहवेहला घृणास्पद अशी मूर्ती कुशल कारागिरांच्या हातांनी घडवितो आणि ती गुप्तपणे ठेवतो तो शापित आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  7. “जो कोणी आपल्या पित्याचा अथवा मातेचा अनादर करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  8. “जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या सीमेची धोंड बदलतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  9. “जो कोणी आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित होय!” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  10. “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  11. “जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  12. “जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  13. “जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  14. “जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  15. “जो कोणी आपल्या शेजार्‍याला गुप्तपणे ठार मारतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  16. “जो कोणी एखाद्या निरपराधी मनुष्याला जिवे मारण्यासाठी लाच घेतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  17. “जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  18. मग यहोशुआने याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासाठी एबाल पर्वतावर वेदी बांधली,

  19. जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली.

  20. तिथेच इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआने मोशेच्या नियमशास्त्राची एक प्रत दगडांवर लिहिली.

  21. सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या.

  22. मग यहोशुआने त्या सर्व लोकांस नियमशास्त्राच्या पुस्तकात जशी लिहिलेली होती तशीच आशीर्वादांची आणि शापांची वचने वाचून दाखविली.