Skip to content

Cloud बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा याजक पवित्रस्थानातून बाहेर आले, तेव्हा याहवेहचे मंदिर मेघाने भरले.

  2. आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने याहवेहचे मंदिर भरले होते.

  3. शलोमोनाने जेव्हा प्रार्थना करण्याचे संपविले, तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्याने होमार्पणे आणि बलिदाने भस्मसात करून टाकली आणि याहवेहच्या गौरवाने मंदिर भरून गेले.

  4. याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते.

  5. जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला, “ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”

  6. तो मनुष्य आत गेला, तेव्हा करूब मंदिराच्या दक्षिणेकडे उभे होते आणि आतील अंगण ढगांनी भरून गेले.

  7. मग याहवेहचे वैभव करुबांवरून उठले आणि मंदिराच्या उंबरठ्याकडे गेले. मंदिर ढगांनी भरले आणि याहवेहच्या तेजाच्या प्रकाशाने अंगण भरले.

  8. मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले.

  9. मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.

  10. नंतर करुबांनी, त्यांच्या बाजूला असलेल्या चाकांबरोबर आपले पंख पसरले आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.

  11. नंतर याहवेहचे गौरव शहरातून वर निघाले व पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबले.

  12. आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते.

  13. इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभूचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले.

  14. पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि त्यात प्रवेश करते वेळी ते भयभीत झाले.

  15. मेघातून एक वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, मी याला निवडले आहे, याचे तुम्ही ऐका.”