Skip to content

Charitableness बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत असाल आणि तिथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काहीतरी आहे,

  2. तर तुमची भेट तिथेच वेदीपुढे ठेवा. आधी जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा.

  3. ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील.

  4. पण जर तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.

  5. “इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही.

  6. कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.

  7. “आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?

  8. सर्व वेळ स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणू शकतोस?

  9. अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल.

  10. मग पेत्र येशूंकडे आला आणि त्याने त्यांना विचारले, “प्रभूजी, माझ्या भावाने अथवा बहिणीने माझ्याविरुद्ध पाप केले, तर मी त्यांना किती वेळा क्षमा करावी? सात वेळेस का?”

  11. येशूंनी उत्तर दिले, “सात नाही तर साताच्या सत्तर वेळा!

  12. “म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे, ज्याला आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यायचा होता.

  13. हिशोब घेत असताना, ज्या नोकरावर राजाचे दहा हजार तालांतचे कर्ज होते, त्याला राजापुढे आणण्यात आले.

  14. त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली.

  15. “तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’

  16. तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले.

  17. “पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली.

  18. “त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’

  19. “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले.

  20. जेव्हा इतर नोकरांनी हे पाहिले, तेव्हा ते क्रोधाने भरून प्रभूकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले.”

  21. तेव्हा प्रभूने ज्या नोकराला क्षमा केली होती, त्या नोकराला बोलाविले. राजा त्याला म्हणाला, “अरे दुष्ट माणसा, मी तुझे सर्व कर्ज माफ केले, कारण तू मला तशी विनंती केलीस;

  22. ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय?

  23. मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले.

  24. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”

  25. जसा तुमचे पिता कनवाळू आहेत, तसे तुम्हीही व्हा.