Skip to content

Charitableness बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.

  2. आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.

  3. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकमेकांची चहाडी करू नका. जो कोणी आपल्या बंधू किंवा भगिनी विरुद्ध बोलतो अथवा त्यांचा न्याय करतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व न्याय करतो, जेव्हा तुम्ही नियमांविरुद्ध न्याय करता आणि ते पाळीत नाही, तर न्याय करणारे व्हाल.

  4. नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहेत, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु आपल्या शेजार्‍याचा न्याय करणारा तू कोण?