मुख्य मजकुरावर जा

Nile

30 verses · 6 known names

हे नावानेही ओळखले जाते: brooks, river, rivers, river's, Shihor

30.0900, 31.2300 गूगल नकाशावर पाहा

Nile चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे, तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो. तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे; तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.”

  2. इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू म्हणालास, “नाईल नदी माझी आहे; मी ती निर्माण केली,”

  3. नाईल नदीचे पाणी मी आटवून टाकेन आणि तो देश दुष्ट राष्ट्रांना विकून टाकेन; विदेशी लोकांच्या हातून मी तो देश व त्यातील सर्वकाही ओसाड करेन. मी याहवेह हे बोललो आहे.

  4. नाईल नदीकाठी वसलेल्या, सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेल्या थेबेस नगरीपेक्षा तू अधिक चांगली आहेस काय? नदीच तिला संरक्षण देते, नदीच तिची तटबंदी आहे.

  5. ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील; उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल. अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल व इजिप्तचा राजदंड निघून जाईल.