मुख्य मजकुरावर जा

Heshbon

37 verses

31.8000, 35.8000 गूगल नकाशावर पाहा

Heshbon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “नंतर इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूतांना पाठविले. जो त्यावेळी हेशबोन येथे राज्य करीत होता आणि त्याला म्हटले, ‘आम्हाला आमच्या स्वस्थानी जाण्यासाठी तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या.’

  2. तीनशे वर्षे इस्राएलने हेशबोन, अरोएर, आजूबाजूच्या वसाहती आणि आर्णोनच्या बाजूची सर्व नगरे ताब्यात घेतली. त्या काळात तुम्ही त्यांना पुन्हा का घेतले नाही?

  3. हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.

  4. “नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले.

  5. हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.

  6. हेशबोन आणि एलिआलेह रडतात, त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत.

  7. हेशबोनची शेते सुकून गेली आहेत, सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा. ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या, त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत. त्यांची कोंबे बाहेर पसरली आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत.

  8. म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.

  9. आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही; हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील: ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’ तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील; तलवार तुमचा पाठलाग करेल.

  10. “त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे हेशबोनपासून एलिआलेह आणि याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम आणि एग्लाथ-शलीशियापर्यंत तो ऐकू येत आहे, निम्रीमाची कुरणेही आता शुष्क झाली आहेत.

  11. “हेशबोनच्या सावलीत फरारी हतबलपणे उभे आहेत, हेशबोनमधून अग्नी येत आहे, सीहोनच्या मध्यातून ज्वाला पसरत आहेत; त्या मोआबाचे कपाळ जाळून टाकीत आहे, त्या कर्कश बढाईखोरांचे मस्तक जाळीत आहे.

  12. “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.