मुख्य मजकुरावर जा

Gilgal

35 verses

31.8600, 35.5100 गूगल नकाशावर पाहा

Gilgal चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सैनिकांनी त्या लुटीतील मेंढरे व गुरे घेतली व त्यातील जे उत्तम ते गिलगालात याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासाठी यज्ञ करावे म्हणून राखून ठेवली आहेत.”

  2. परंतु शमुवेलने म्हटले, “जसे तुझ्या तलवारीने अनेक स्त्रियांना अपत्यहीन केले, तसेच तुझी आई स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” आणि शमुवेलने याहवेहसमोर गिलगालात अगागाला मारून टाकले.

  3. नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला. यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले.

  4. जेव्हा राजा यार्देन पार करून गिलगालकडे गेला, किमहाम सुद्धा त्यांच्याबरोबर गेला. यहूदाहचे सर्व सैन्य आणि इस्राएलच्या अर्ध्या सैन्यांनी दावीदाला पार नेले.

  5. “हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. “गिलगालकडे जाऊ नका; वर बेथ-आवेन येथे जाऊ नका. आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.

  6. “गिलगालात त्यांची सर्व दुष्कृत्ये आहेत, मी त्यांचा तिथेच द्वेष केला. त्यांच्या पापी कृत्यांमुळे, मी त्यांना माझ्या घरातून हाकलून देईन. मी यापुढे त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व पुढारी बंडखोर आहेत.

  7. गिलआद दुष्ट आहे काय? त्याचे लोक निरुपयोगी आहेत! ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या ढिगार्‍यासारख्या असतील.

  8. “बेथेलास जा आणि पाप करा; गिलगालास जाऊन आणि अधिक पाप करा. रोज सकाळी आपली अर्पणे, दर तीन वर्षांनी आपला दशांश आणा.

  9. बेथेलचा शोध करू नका, गिलगाल येथे जाऊ नका, किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका. कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल, आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल”

  10. माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”