मुख्य मजकुरावर जा

Ashkelon

11 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Askelon

31.6600, 34.5400 गूगल नकाशावर पाहा

Ashkelon चा उल्लेख असलेली वचने

  1. यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.

  2. नंतर याहवेहचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. तो खाली अष्कलोनला गेला, त्यांच्यापैकी तीस लोकांना मारले, त्यांच्याकडून सर्वकाही काढून टाकले आणि ज्यांनी कोडे समजावून सांगितले त्यांना त्यांचे कपडे दिले. रागाने पेटून तो आपल्या वडिलांच्या घरी परतला.

  3. पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.

  4. “गथमध्ये हे सांगू नका, अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील.

  5. त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे; व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक);

  6. गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल; अष्कलोन पूर्णपणे निःशब्द होईल. अहो तुम्ही घाटातील अवशिष्ट लोकहो, तुम्ही केव्हापर्यंत स्वतःच्या देहास जखमी कराल?

  7. परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

  8. मी अश्दोदच्या राजाचा आणि अष्कलोनचा राजदंड धरणार्‍याचा नाश करेन. शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाही तोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.

  9. गाझाचा त्याग करण्यात येईल आणि अष्कलोन ओसाड पडेल. भर दुपारी अश्दोद नगर रिकामे होईल आणि एक्रोन समूळ उपटले जाईल.

  10. ती भूमी यहूदीयाच्या वंशातील अवशेषाचे वतन होईल; तिथे त्यांची कुरणे असतील. संध्याकाळी ते अष्कलोन येथील घरात विश्रांती घेतील. याहवेह, त्यांचे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतील; त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत प्राप्त करून देतील.

  11. अष्कलोन हे पाहून भयभीत होईल; गाझा वेदनेने कळवळेल, व एक्रोन देखील निराशेने कोमेजून जाईल. गाझा नगरीच्या राजाला ठार करण्यात येईल आणि अष्कलोन नगरी ओसाड होईल.