मुख्य मजकुरावर जा

Joshua

189 वचने · 1 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Oshea, Jehoshua, Hoshea, Jeshua, Jesus

Joshua चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर यहोशुआ सर्व लोकांस म्हणाला, “पाहा, ही धोंड आपल्याविरुद्ध साक्ष असेल. याहवेह जे आपल्याशी बोलले तो प्रत्येक शब्द तिने ऐकला आहे. जर तुम्ही तुमच्या परमेश्वराबरोबर खरेपणाने राहिला नाहीत तर ती तुमच्याविरुद्ध साक्ष देईल.”

  2. नंतर यहोशुआने त्या लोकांना आपआपल्या वतनास पाठवून दिले.

  3. या गोष्टीनंतर, याहवेहचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला.

  4. इस्राएली लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला, त्यांनी याहवेहची सेवा केली.

  5. यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?”

  6. नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले.

  7. लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेली महान कृत्ये ज्यांनी पाहिली त्यांनी याहवेहची सेवा केली.

  8. नूनाचा पुत्र यहोशुआ, याहवेहचा सेवक, वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला.

  9. यहोशुआ मरण पावल्यावर, यापुढे मी घालविलेल्या राष्ट्रांपैकी कोणतेही राष्ट्र त्यांच्यापुढून घालविणार नाही.

  10. याहवेहने त्या राष्ट्रांना तिथेच राहू दिले; यहोशुआच्या हातात देऊनही त्यांना एकदम घालवून दिले नाही.

  11. अहाबाच्या काळात, बेथेलचा हिएल याने यरीहोची पुनर्बांधणी केली. त्याने त्याचा पाया घातला, तेव्हा त्याचा प्रथमपुत्र अबीराम मरण पावला आणि जेव्हा त्याची फाटके उभारली तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब मरण पावला; नूनाचा पुत्र यहोशुआच्या द्वारे याहवेहने सांगितलेल्या वचनानुसार हे सर्व घडले.

  12. त्याचा पुत्र नून व त्याचा पुत्र यहोशुआ.

  13. या मांडवामध्ये बंदिवासातून परत आलेले सर्वजण सणाचे सात दिवस राहिले. नूनाचा पुत्र येशूआ याच्या काळापासून हा सण इस्राएली लोकांनी अशा प्रकारे साजरा केलेला नव्हता. प्रत्येकाचा आनंद खूप मोठा होता.

  14. जेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्यांच्या समोरून हाकलून दिले तेव्हा त्यांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि आपल्या पूर्वजांनी यहोशुआच्या नेतृत्वाखाली जो निवासमंडप त्यांच्याबरोबर आणला तो त्या जमिनीवर दावीद राजाच्या काळापर्यंत तिथेच राहिला.