God
God चा उल्लेख असलेली वचने
मग याहवेह मोशेला म्हणाले, “त्या मनुष्याने मरावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर धोंडमार करावा.”
मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली.
याहवेह मोशेला म्हणाले,
ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये.
मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल.
तुमचा परमेश्वर व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले तो मीच याहवेह आहे. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”
मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील.
आणि उद्या त्यात जळते निखारे व धूप टाकून ती याहवेहपुढे ठेवा. ज्याला याहवेह निवडतील तोच पुरुष पवित्र ठरेल. लेवींच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले आहे!”
तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय?
त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता.
तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”
मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.”
पुढे मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तुला अनुसरणाऱ्या सर्वांना घेऊन तू येथे याहवेहसमोर ये. तू आणि ते व अहरोनही त्यावेळी हजर असेल.
प्रत्येकाने असे सर्व मिळून आपआपल्या दोनशे पन्नास धुपाटण्या धुपासह याहवेहसमक्ष घेऊन यावे. अहरोन त्याचे आणि तू तुझे धुपाटणे घेऊन हजर व्हावे.”
जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले.
याहवेह, मोशे व अहरोन यांना म्हणाले,
“तुम्ही या लोकांच्या समुदायापासून दूर व्हा म्हणजे मी क्षणार्धात त्यांचा नाश करेन.”
पण मोशे आणि अहरोन याहवेहपुढे जमिनीवर पालथे पडले व विनंती करून म्हणाले “हे परमेश्वरा, सर्व जीवधार्यांना जीवनाचा श्वास प्रदान करणाऱ्या परमेश्वरा, एकाच मनुष्याने पाप केले तरी तुम्ही सर्व लोकांवर रागावणार काय?”
नंतर याहवेह मोशेला म्हणाले,
त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल:
जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही.
परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.”
नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.
याहवेह मोशेला म्हणाले,