मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु पापाची भरपाई करण्यासाठी त्या व्यक्तीचा कोणीही जवळचा नातेवाईक नसेल तर ती भरपाई याहवेहची असावी आणि पापासाठी प्रायश्चित करण्याच्या मेंढ्यासह ती याजकाकडे द्यावी.

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  3. “ ‘याजकाने त्या स्त्रीला आणावे आणि तिला याहवेहसमोर उभे करावे.

  4. नंतर याजकाने तिला याहवेहपुढे उभे केल्यानंतर, त्याने तिचे केस मोकळे सोडावे आणि तिच्या स्मरणाचे अर्पण, मत्सरासाठी केलेले अन्नार्पण तिच्या हातावर ठेवावे व त्याने शाप आणणारे कडू पाणी आपल्या हाती घ्यावे.

  5. यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

  6. याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.

  7. किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा.

  8. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  9. “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: एखादा पुरुष किंवा स्त्री याहवेहला समर्पित नाजीर होण्याचा एक विशेष नवस करू इच्छितात,

  10. “ ‘नाजीरपणाच्या संपूर्ण काळात त्यांच्या डोक्यावर वस्तरा फिरवू नये. त्यांनी याहवेहला समर्पित केलेला नवसाच्या काळ संपेपर्यंत त्यांनी पवित्र असावे; त्यांनी आपले केस लांब वाढू द्यावेत.

  11. “ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये.

  12. त्यांचे स्वतःचे वडील किंवा आई किंवा भाऊ किंवा बहीण जरी मरण पावले, तरीही त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःला विधिपूर्वक अशुद्ध करू नये, कारण परमेश्वराला समर्पित केल्याचे प्रतीक त्यांच्या डोक्यावर आहे.

  13. समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत ते याहवेहसाठी पवित्र आहेत.

  14. आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले.

  15. त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्‍हा आणावा.

  16. “ ‘याजकाने ही अर्पणे याहवेहसमोर सादर करून पापार्पण व होमार्पण करावे.

  17. याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्‍हाचा यज्ञ करावा.

  18. नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो.

  19. “ ‘हा नाजीराचा नियम आहे, जे आपल्या समर्पणानुसार याहवेहला अर्पण करण्याचा नवस करतात, त्या खेरीज त्यांना परवडेल त्यानुसार आणावे. नाजीराच्या नियमानुसार केलेले नवस त्यांनी पूर्ण केले पाहिजे.’ ”

  20. याहवेह मोशेला म्हणाले,

  21. “ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो;

  22. याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो;

  23. याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’

  24. “अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.”

  25. त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.