मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हेलेम, तोबीयाह आणि यदायाह आणि सफन्याहचा पुत्र हेन, यांना याहवेहच्या मंदिराचे स्मृतिचिन्ह म्हणून मुकुट देण्यात येईल.

  2. दूरवर असलेले लोकही येतील व याहवेहचे मंदिर बांधण्यासाठी मदत करतील, तेव्हा तुला कळेल की सर्वसमर्थ याहवेहनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझे परमेश्वर याहवेह त्यांच्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तरच हे घडेल.”

  3. दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्‍याहला याहवेहकडून संदेश मिळाला.

  4. बेथेल शहरात राहणार्‍या यहूदी लोकांनी राजाचा प्रमुख शासकीय अधिकारी शरेसर आणि रगेम-मेलेकच्या नेतृत्वाखाली लोकांचे एक पथक यरुशलेमच्या मंदिरात याहवेहचा आशीर्वाद मागण्यासाठी,

  5. सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराच्या याजकांना आणि संदेष्ट्यांना विचारून, “मी इतकी वर्षे करत आलो त्याप्रमाणे मी पाचव्या महिन्यात शोक व उपवास करावा काय?”

  6. मग सर्वसमर्थ याहवेहचे वचन मला आले:

  7. “तुमच्या देशातील सर्व लोकांना आणि याजकांना हा प्रश्न विचार, ‘गेली सत्तर वर्षे तुम्ही पाचव्या आणि सातव्या महिन्यात जे उपवास आणि शोक करीत होता, ते खरोखर माझ्यासाठी उपवास करत होते काय?

  8. ज्यावेळी यरुशलेम आणि तिच्या सभोवतीची उपनगरात शांती व समृद्ध होती आणि नेगेव व दक्षिणेकडील तळवटीच्या प्रदेशातील लोकांचा तिथे जम बसला होता, त्यावेळीच याहवेहनी संदेष्ट्यांद्वारे लोकांना इशारा दिला नव्हता का?’ ”

  9. जखर्‍याहला याहवेहकडून पुन्हा संदेश आला:

  10. “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘निष्पक्ष न्यायदान करा; एकमेकांशी करुणेने व दयेने वागा.

  11. त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला.

  12. “ ‘जेव्हा मी त्यांना हाक मारली, त्यांनी ऐकण्याचे नाकारले; म्हणून त्यांनी मला हाक मारली, की मी त्यांचे ऐकणार नाही, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  13. चक्रीवादळाप्रमाणे मी त्यांची दूरदूरच्या देशांत पांगापांग केली. त्यांनी मागे सोडलेला त्यांचा देश असा ओसाड झाला, की त्यातून कोणी प्रवासदेखील करेनासे झाले. एकेकाळचा तो रमणीय देश आता त्यांनी निर्जन केला.’ ”

  14. सर्वसमर्थ याहवेहचे वचन मला प्राप्त झाले.

  15. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “सीयोनेबाबत मला अत्यंत ईर्षा वाटते; मी तिच्याबद्दल ईर्षेने ज्वलंत झालो आहे.”

  16. याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”

  17. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पुन्हा एकदा त्या नगरीतील परिपक्व वयाचे स्त्री व पुरुष यरुशलेमच्या रस्त्यांवर बसतील, प्रत्येकजण वयातीत असल्यामुळे आपल्या काठ्या टेकीत येतील,

  18. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्यावेळी हे अवशिष्ट लोकांना अद्भुत वाटेल, परंतु मला ते अद्भुत वाटेल का?” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  19. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी माझ्या लोकांना पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सोडवून आणेन.

  20. त्यांनी यरुशलेमात राहावे यासाठी मी त्यांना पुन्हा आणेन; आणि ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा विश्वासयोग्य आणि न्यायी परमेश्वर होईन.”

  21. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “आता हे शब्द ऐका, ‘तुमचे बाहू बलवंत करा, जेणेकरून मंदिर बांधून पूर्ण होईल.’ जेव्हा सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराचा पाया घातला, तेव्हा जे संदेष्टे तिथे हजर होते, त्यांनी तुम्हाला हे सांगितले होते.

  22. त्या वेळेपर्यंत लोकांना कामासाठी मजुरी नव्हती किंवा जनावरे भाड्याने मिळत नव्हती. शत्रूच्या भयापायी कामधंदे करण्यास इतरत्र जाणे सुरक्षित नव्हते, कारण मी तुम्हा प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याविरुद्ध केले होते.

  23. पण आधी मी वागलो तसे मी आता या अवशिष्ट लोकांशी वागणार नाही,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  24. “ते बियाणे चांगले वाढेल, द्राक्षवेली फळे देतील, भूमी पीक देईल, आणि आकाश त्याचे दव पाडेल. मी या लोकांच्या अवशिष्टास त्यांचा वारसाहक्क म्हणून हे सर्व देईन.

  25. जसे तुम्ही, यहूदीया व इस्राएल सर्व राष्ट्रात शाप म्हटले जात असत, तर मी तुम्हाला वाचवून तुम्हाला आशीर्वाद असे करेन. तुम्ही भिऊ नका तर तुमचे बाहू बलवान करा.”